आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लूटमार:माजलगावात भरदिवसा वृद्ध व्यापाऱ्यास लुटले

माजलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील व्यापारी उत्तम दगडोबा गडम यांना शहराच्या मध्यवस्तीतून गाडीवर बसवत बायपासवरील मंगलनाथ मंदिराकडे घेऊन नेत धमकावून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याची घटना माजलगाव शहरात रविवारी घडली. उत्तम दगडोबा गडम हे माजलगावातील कपडा व्यापारी आहेत. ते आज नेहमीप्रमाणे माजलगावच्या हनुमान चौकातील मारुती मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन बाहेर येताच एक जण बाहेर उभा होते. त्याने गडम यांना जवळ बोलावले. आम्हाला मंगलनाथ मंदिराला देणगी द्यायची आहे, ती कुणाकडे द्यावी लागेल, आम्हाला मदत करा, असे म्हणत त्यांच्याकडे विचारपूस केली. शिवाय त्यांना गाडीवर बसण्याची विनंती केली. गडम हेही त्यांच्या बोलण्यात आले. त्यांनी त्यांच्यासोबत गाडीवर बसून मंगलनाथ मंदिराचा रस्ता पकडला. तेथे आधीपासूनच दोघे होते. त्यांनी स्वत:ला पोलिस असल्याचे सांगत अंगावरील दागिने काढा, असे म्हणत धमकावले व सोन्याच्या अंगठ्या अंगावरील ९० ग्रॅम सोन्याचे दागिने काढून घेतले.

बातम्या आणखी आहेत...