आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:इको ब्रिक्सच्या माध्यमातून प्लास्टिक‎ मुक्तीसाठी राबवला जातोय उपक्रम‎

अंबाजोगाई‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई‎ येथील योगेश्वरी नूतन‎ विद्यालयाच्या आठवी, नववीच्या‎ विद्यार्थ्यांनी इको ब्रिक्सच्या‎ माध्यमातून प्लास्टिक मुक्तीचा‎ उपक्रम राबवत आहेत. या‎ कौतुकास्पद उपक्रमामुळे शालेय‎ परिसर प्लास्टिक मुक्त होत‎ असून, पर्यावरण संवर्धनासाठी‎ महत्त्वाची बाब ठरत आहे.‎ शाळेतील सहशिक्षिका वैशाली‎ भुसा उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना‎ मार्गदर्शन करत अाहेत.‎ घराच्या आजूबाजूला,‎ मैदानावर शालेय परिसरात फेकून‎ दिलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या‎ बॉटल्स जमा करण्यात येतात.

या‎ बाटल्यांमध्ये कॅरीबॅग, चॉकलेटचे‎ रॅपर्स अथवा कोणत्याही प्रकारचे‎ प्लास्टिक असो ते जमा करून‎ गच्च भरले जाते. साधारणपणे‎ एका बाटलीत दीड किलो पेक्षा‎ अधिक प्लास्टिक मावते. त्यानंतर‎ या बाटल्यांचा वापर विटा म्हणून‎ उपयोगात आणल्या जातो.खास‎ करून झाडांचे आळे‎ बनविण्यासाठी वापर करता येतो‎ आहे.त्याचप्रमाणे कचऱ्याचेही‎ प्रमाण कमी होत करण्यास मदत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मिळते. प्लास्टिक कचऱ्याचे‎ विघटन करणे आव्हानात्मक‎ असल्यामुळे पर्यावरणात हा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कचरा वर्षानुवर्षे तसाच असतो.‎ मोठ्या प्रमाणात हा कचरा‎ समुद्रात किंवा नद्यांमध्ये‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अडल्याने पाण्यातील जीवांनाही‎ याचा धोका वाढतो.‎

या विद्यार्थ्यांनी‎ नोंदवला सहभाग‎ या उपक्रमात पार्थ खोत, समाधान‎ नागरगोजे, वैभव थोरात, अजिंक्य‎ थोरात, प्रणव नखाते, प्रतिक‎ धारेकर, श्रेयश जगताप, अथर्व‎ दास, अभय पवार, अविष्कार झांजे,‎ शुभम कोल्हे, शिवतेज शिंदे,‎ प्रथमेश मोहरे, ईश्वर गायकवाड व‎ इतर अनेक विद्यार्थ्यांचा या‎ उपक्रमांमध्ये सहभाग आहे.‎ योगेश्वरी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इको ब्रिक्स तयार केले आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...