आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूलमध्ये आनंद मेळावा उत्साहात‎

पाटोदा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या‎ आगमनासाठी विद्यार्थी, पालक आणि सर्व‎ शिक्षक यांचा आनंद मेळावा लिटल फ्लॉवर‎ इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात पार पडला. या‎ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एसबीआय‎ बँकेचे शाखा व्यवस्थापक विजयकांत पाटील‎ हे होते. त्यांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे फीत‎ कापून उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे‎ म्हणून छत्रपती शाहू बँकेचे व्यवस्थापक‎ बियाणी हजर होते.

याप्रसंगी शाळेचे प्राचार्य‎ पठाण यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन‎ स्वागत केले व त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा‎ दिल्या. शाळेच्या आनंद मेळावा यशस्वी‎ करण्यासाठी शाळेचे शिक्षक भाऊसाहेब‎ सावंत, क्रिस्टोफर, कृष्णा सानप, अर्जुन‎ सानप, सुजित घोलप, शिक्षिका सीमा माळी,‎ शरयू, वसुंधरा, अश्विनी देशमुख, ज्योती,‎ रंजना, प्रियंका, शितल, पल्लवी पाटील,‎ मोहिनी, प्रिया आदींची उपस्थिती होती.‎ कार्यक्रमाचे कौतुक प्रमुख पाहुणे आणि‎ पालकांकडून करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...