आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिधा‎ किट वाटप:नाकलगाव ग्रामस्थांना आनंदाचा शिधा‎ किट वाटप, योजनांचीही दिली माहिती‎

दिंद्रुडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव तालुक्यातील नाकलगाव येथे समस्त‎ शिधा पत्रिका धारकांना आनंदाचा शिधा शुक्रवारी (ता.४‎ नोव्हेंबर) सकाळी वाटप करण्यात आला. तसेच‎ शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.‎

यावर्षी महाराष्ट्र सरकारने केवळ शंभर रुपयात गोडतेल,‎ रवा, साखर व चनाडाळ असे प्रत्येकी एक-एक किलो‎ साहित्य आनंदाचा शिदा या किटद्वारे उपलब्ध केला‎ असून, नाकलगाव येथील राशन दुकानदार रमेश झोडगे‎ यांनी शुक्रवारी सकाळी सर्व ग्रामस्थांना या किटचे वाटप‎ केले. सर्व ग्राहकांनी या सुविधेचा लाभ मिळाल्याने‎ आनंद व्यक्त केला. गावातील एक ही पात्र लाभार्थी या‎ योजनेपासून वंचित ठेवणार नसल्याचे राशन दुकानदार‎ झोडगे यांनी सांगितले. याप्रसंगी गावातील मान्यवर व‎ ग्रामस्थ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...