आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर जखमी:बीड - पाथर्डी रोडवर अपघात,‎ आनंदगावच्या तरुणाचा मृत्यू‎

शिरूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कासार‎ बीड पाथर्डी रोडवर तागडगांव फाटा ते नागरेवाडी‎ दरम्यान झालेल्या भिषण अपघातात आनंदगावातील‎ एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी साडे चार‎ पाचच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार‎ आनंदगाव येथील रहिवासी असलेले शिवलिंग विघ्ने‎ मुकादम यांचा मुलगा लहू विघ्ने हे साधारण‎ महिन्यांपासून गावाकडे आले होते. ते मुबंईला‎ ड्रायव्हर म्हणून काम करत होते त्यांचा एक भाऊ‎ ऊसतोडीसाठी सातारा जिल्ह्यात कारखान्यावर गेला‎ होता. लहू विघ्ने हे गांवाकडे ट्रॅक्टर मधून परत येत‎ असताना रोडवर पडल्याने गंभीर जखमी झाले.‎

डोक्याला मार लागुन रक्ताच्या थारोळ्यात पडून‎ जागेवरच मृत्यू झाला असल्याची माहिती‎ पोलिसाकडून सांगितली गेली. रायमोह येथील‎ ग्रामीण रूग्णालयात उत्तरीय तपासणी करण्याचे काम‎ सुरू असल्याचे सांगितले गेले. मयत लहू विघ्ने यांचे‎ पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक मुलगा, एक‎ मुलगी आहे. विघ्ने कुटूंबावर मोठे विघ्न ओढवल्याने‎ हळहळ व्यक्त केली जात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...