आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेन्शन योजना:अंगणवाडी सेविकांची पदयात्रा, मोर्चा मागे ; दरमहा पेन्शन योजना लागू करण्याचा प्रस्ताव

केज14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

“अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्यात येईल. त्यांना दरमहा पेन्शन योजना लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन,’ असे आश्वासन महिला व बालविकासमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींना दिले. त्यामुळे अंगणवाडी सेविकांची पदयात्रा काढून आंदोलन मागे घेण्यात आले. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्यांसंदर्भात २० जून रोजी यवतमाळ येथून अमरावतीपर्यंत पदयात्रा काढून २५ जून रोजी महिला व बालविकासमंत्र्यांच्या अमरावती येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी, १७ जून रोजी महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडीच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावून बैठक घेतली. बैठकीला महिला व बालविकास विभागाचे उपसचिव ठाकूर, संबंधित विभागाच्या आयुक्त रुबल अग्रवाल, राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष कॉ. एम. ए. पाटील, कॉ. निशा शिऊरकर, राजेश सिंह, विजया सांगळे, माया पवार, हुकूमताई ठमके, अरुणा आलोणे, चंदा लिंगनवार, ज्योती कुलकर्णी हे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...