आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीसोबत कौटुंबिक वादाचा राग:मामाकडून चार वर्षीय चिमुकल्या भाच्याचा झोपेतच खून; परळीच्या दौनापूर येथील घटना

परळी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या आईसोबत मामाच्या गावी आलेल्या चार वर्षीय चिमुकल्या भाच्याचा झोपेत हत्याराने वार करून सख्ख्या मामानेच खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री नागापूर (ता. परळी) येथे घडली. कार्तिक विकास करंजकर असे या चिमुकल्याचे नाव आहे.

परळी तालुक्यातील दौनापूर येथील शहाणिक लक्ष्मण चिमनकर हे आपल्या कुटुंबासह नागापूर कॅम्प परिसरातील गायरान जमिनीवर गेल्या काही वर्षांपासून राहातात. शहाणिक हे आपल्या आईस सारखा त्रास देत असल्याने या कुटुंबातील विवाहित मुलगी सुरेखा विकास करंजकर (रा. लाडेगाव,ता.केज) तीन दिवसांपूर्वीच नागापूर येथे आली. सोबत आपला चारवर्षीय कार्तिक विकास करंजकर होता.

शनिवारी याच कारणावरून दोघा बहीण-भावात वाद झाल्याने ती रविवारी परत आपल्या सासरी जाणार होती. परंतु शनिवारी मध्यरात्री सर्व जण झोपेत असताना मुलाचा सख्खा मामा शहाणिक लक्ष्मण चिमणकर (२५) याने घरातील भाजी कापण्याची बतई घेऊन झोपेतच असलेल्या चिमुकल्याचे तोंड दाबून बतईने पोटात वार केले.

मुलाचा रडण्याचा आवाज येताच आई व मुलगी जागे झाले. या अवस्थेत त्या बालकास परळी व नंतर अंबाजोगाई व लातूर येथे हलवले. परंतु त्या बालकाचे प्राण वाचू शकले नाही. दरम्यान, परळी ग्रामीण पोलिस ठाण्याला ही माहिती कळताच परळी ग्रामीण पोलिस नागपूर कॅम्प येथे घटनास्थळी पोहोचले. घटनेची सविस्तर माहिती व अधिकचा तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत. याप्रकरणी अपर पोलिस अधीक्षक नेरकर यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. गुन्हा दाखल करून पुढील तपास बीट अधिकारी पीएसआय पौळ करीत आहेत. आरोपीला ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...