आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:सरपंचाच्या विशेष अधिकारातील मताने‎ अंजनडोहला उपसरपंचाची झाली निवड‎

धारूर‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर‎ नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत ‎सार्वत्रिक निवडणुकीत‎ अंजनडोहच्या उपसपंचाची निवड ‎ ‎ सरपंचाच्या विशेष अधिकाराने‎ झाली. उपसरपंचपदी प्रकाश‎ सोळंके यांची निवड झाली.‎ अंजनडोह गामपंचायत नऊ ‎सदस्यांची आहे येथे सरपंचाच्या‎ गटाचे चार तर विरोधी गटाचे पाच‎ सदस्य निवडून आलेले होते.‎ उपसरपंच पदासाठी अंजनडोह येथे‎ निवडणुक घेतली गेली.

प्रकाश‎ पंडीतराव सोळंके तर दुसऱ्या‎‎ गटाकडून रतन शेंडगे यांनी अर्ज‎ केला होता. पहील्या फेरीत प्रकाश‎ सोळंके यांना सरपंचाने मतदान‎ केल्यान पाच मतदान झाले तर रतन‎ शेंडगे यांनाही पाच मते झाली.‎ समसमान मते झाल्यानंतर दुसऱ्या‎ फेरीत शासनाच्या नवीन‎ धोरणानुसार सरपंच उषा सोळंके‎ यांनी विशेष अधिकारात मतदान‎ केल्याने प्रकाश सोळंके यांना सहा‎ मते झाली. यात उपसरपंच पदी‎ प्रकाश सोळंके यांची निवड झाली.‎

बातम्या आणखी आहेत...