आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोका‎:अंकुशनगर, राधानगरी परिसर घाणीच्या‎ विळख्यात; नागरी आरोग्याला धोका‎

बीड‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड शहरात आम आदमी पार्टीच्या‎ वतीने नागरिकांशी संवाद साधत नागरी‎ प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम केले‎ जात असून अंकुश नगर, राधानगरी‎ येथे अस्वच्छतेची पाहणी करण्यात‎ आली. याबाबत पालिका प्रशासनाला‎ निवेदन देऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी‎ प्रयत्न करणार असल्याचे आपचे‎ जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी‎ सांगितले.‎ अंकुशनगर व राधानगरी या‎ भागातील नागरिकांसमोर अनेक प्रश्न‎ आहेत. सर्व कर भरूनही मूलभूत‎ सुविधांपासून नागरिकांना वंचित ठेवले ‎जात आहे.

कित्येक वर्षापासून येथील ‎नागरिकांना साधा रस्ता व नाल्यांची सुविधाही भेटू शकलेली नाही. याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे. अस्वच्छतेमुळे मलेरिया, डेंगू अशा आजारांचा फैलाव होत आहे. त्यामुळे ‎मोठ्या प्रमाणात नागरिक त्रस्त आहेत. ‎प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे अन्यथा येथील नागरिक उद्रेक करतील व या‎ सर्व गोष्टी प्रशासन जबाबदार असेल,‎ असा इशाराही आम आदमी पार्टीने‎ दिला. याबाबत मुख्याधिकारी यांना‎ प्रतिनिधी मंडळ भेटणार असल्याची‎ माहिती आपचे जिल्हाध्यक्ष अशोक‎ येडे, शहराध्यक्ष सय्यद सादेक, सचिव‎ रामधन जमाले, बीड तालुका उपाध्यक्ष‎ आजम खान, शहर सचिव मिलिंद‎ पाळणे, पवार, वाघ इत्यादी नागरिक‎ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...