आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशहीर अण्णाभाऊ साठे:अण्णा भाऊंनी साहित्यातून वंचितांची व्यथा मांडली

बीड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकशहीर अण्णाभाऊ साठे यांनी अंत्यत खडतर परिस्थितीत जीवन जगत अन्यायात खिचपत पडलेल्या समाजाला नवी वाट दाखवली. त्यांनी आपल्या प्रखर लेखन साहित्यातून दीनदलितांची व्यथा ठळकपणे मांडली, असे प्रतिपादन ॲड.मनोज संकाये यांनी केले.

परळी येथील शारदाबाई मेनकुदळे माध्यमिक विद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. शाळेतील मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक उत्तम शंकर साखरे, रवींद्र गिराम, बिभीषण केंद्रे, मदन कराड, राजाभाऊ राठोड, सुनील अष्टेकर, दिलीप स्वामी, मिलिंद नरभाये उपस्थित होते. ॲड.संकाये म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपले आयुष्य हे दलित, बहुजन, गोरगरीब, शेतमजूर आणि कष्टकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी झिजविले. दीड दिवस शाळेत शिकून त्यांनी दर्जेदार साहित्याची निर्मिती केली. यावेळी मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी दीपक शेटे, शिवा बडे, मुंजाभाऊ साठे, नवनाथ क्षीरसागर, काशिनाथ सरवदे, बालू गुट्टे, सुंदर आव्हाड, राम चाटे, संतोष कांबळे, वसंत मुंडे, जयसिंग रोडे, किरण माने,आकाश धडसिंग आदी उपस्थित होते.

विड्यात २१ जणांचे रक्तदान
केज तालुक्यातील विडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २१ तरुणांनी रक्तदान केले. यासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही, पेन बिस्किटे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सुरज पटाईत, उपसरपंच सदाशिव वाघमारे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शीला कांबळे, मुख्याद्यापक श्री. सुरवसे, शिक्षक श्री. काकनाळे, नामदेव दुनघव, विकास दुनघव, रामेश्वर दुनघव, परमेश्वर गालफाडे, तानाजी दुनघव, आकाश जाधव, गणेश दुनघव, रक्षक दुनघव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

केएसपी विद्यालय, बीड
बीड शहरातील शहरातील कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले विद्यालय विद्यालयामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला संस्थाध्यक्षा अंजली शेळके, शाळेचे प्र.मुख्याध्यापक जगदीश शिंदे, गटशिक्षणाधिकारी ऋषिकेश शेळके यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी मान्यवरांनी महापुरुषांच्या कार्याला उजाळा दिला.

गुरुदेव विद्यालय, मोरेवाडी
बनेश्वर शिक्षण संस्था संचलित गुरुदेव विद्यालय मोरेवाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंबाजोगाई तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार व पुरवठा अधिकारी मिलिंद गायकवाड यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श क्रीडा शिक्षक मनेष गोरे व अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका शशिकला काकडे यांची उपस्थिती होती. यानिमित्ताने गुरुदेव परिवाराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी दोन गटांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते तसेच गरजू विद्यार्थ्यांना सूर्यकांत तेलंग यांच्या सौजन्याने गणवेश वाटपही करण्यात आले.

जिजामाता विद्यालय, बीड
शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या जिजामाता विद्यालयात लोेकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आखाडे तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ढोरमारे उपस्थित होते. यावेळी कुलकर्णी, रेगुडे, दरे, शिंदे, धायगुडे, पांचाळ, घाडगे, अंकुश शिंगाडे आदींची उपस्थिती होती.

शिवसंग्राम भवन, बीड
बीड येथे माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसंग्राम भवन येथे लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीदिन व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष राजन घाग, भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशीद, युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील, अॅड.मनीषा कुपकर, अॅड.राहुल मस्के आदींसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

दिंद्रुड परिसरात अभिवादन यात्रा
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते गोविंद केकान यांच्या संकल्पनेतून “लोकशाहीरास अभिवादन’ या अभिवादनपर यात्रेची सुरुवात माजलगाव ते वाटेगाव (जि. सांगली) पर्यंत करण्यात आली. रविवारी सायंकाळी निघालेल्या या यात्रेस झेंडा दाखवत युवा कार्यकर्ते गोविंद केकान यांनी सुरुवात केली. यावेळी परिसरातील लहुजी सेनेचे कार्यकर्ते व समाज बांधव हजर होते. उपस्थित मान्यवरांनी अण्णा भाऊंच्या कार्यावर भाषणातून उजाळा दिला.

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण
केज तालुक्यातील सुकळी येथील सामाजिक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते कैलास जावळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त गावातील शाळेतील व माळेगाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप केले. यावेळी मुख्याध्यापक सोमनाथ लोकरे, अतुल जाधव गुजर सोमनाथ, सुरेंद्र सारुक, महादेव फुंदे, मन्मथ लामतुरे, अशोक इतापे, कुंडलिक ढाकणे हे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...