आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैफल:अण्णा भाऊ माझा लेखणीचा राजा; दिंद्रुडमध्ये रंगली मैफल

दिंद्रुड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती दिनानिमित्त गायिका राधा खुडे आणि गरुडा गुळीक यांच्या बहारदार गितांनी दिंद्रुड मध्ये संगीत मैफिल चांगलीच रंगली होती. यावेळी शिवबा,अण्णा भाऊ, लहुजी, भिमगितांसह आदि महापुरुषांच्या गितांनी प्रेक्षकांचचा प्रतिसाद मिळाला.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचे स्वीय सहायक डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सरपंच अजय कोमटवार अध्यक्षस्थानी होते. बाबा कांबळे यांच्या पुढाकाराने या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दीड दिवस शाळेत जाऊन अण्णा भाऊंनी ३५ कादंबऱ्या, १५ कथासंग्रह, १२ पटकथा, १० पोवाडे व ७ चित्रपट कथा असे ऐतिहासिक साहित्य निर्माण केले व त्यांची गाजलेली फकीरा हि कादंबरी २५ भाषेत भाषांतरीत झाली असल्याचे मनोगत डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डीपीआयचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे यांनी केलेे.

यावेळी राधा खुडे आणि गुळीक यांनी “जवा गाण माझ येत, गर्वहरण करून जात’, “अण्णा भाऊ माझा लेखणी चा राजा”, “फिरंगी घाबरून गेलाय घोरान”, “चैती पोरणीमेचा थाट,भक्तांचा गजबजाट”, “माझा शिवबा जन्मला नसता, तर माझा धर्म बुडाला असता”, “राजा राणीच्या जोडीला सात मजली माडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला” “खंडोबाची कारभारीण, झाली बानु धनगरीन”, “माझी मैना गावाकडं राहिली”, अशी अनेक लोकप्रिय, समाज प्रबोधनपर गीते सादर केली. सूत्रसंचालन सुनील वाव्हळकर व सुनील मदने यांनी केले. दरम्यान, या संगित रजनीला मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. टाळ्या, शिट्ट्यांनी रसिकांनी सादर होत असलेल्या गितांना दाद दिली तर, रसिकांमधून होणारी गाण्यांची फर्माइशही गायकांकडून पूर्ण केली जात होती. या कार्यक्रमासाठी दिंद्रूडसह परिसरातील गावांमधून महिला, पुरुष, तरुणांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...