आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक‎ स्नेहसंमेलन:जोगेश्वरी विद्यालयाचे‎ वार्षिक स्नेहसंमेलन‎

अंबाजोगाई‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जोगेश्वरी विद्यालय‎ अंबासाखर शाळेत नुकतेच वार्षिक‎ स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.‎ विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे‎ सादरीकरण करत उपस्थितांचे मन‎ जिंकून घेतले.‎ प्रमुख पाहुणे म्हणून अंबाजोगाई‎ येथील साखर कारखान्याचे एमडी‎ साखरे, व्यंकटेश्वरा साखर‎ कारखान्याचेचे मुख्य कार्यकारी‎ अधिकारी जंगम, मुख्य सुरक्षा‎ अधिकारी वाघमारे हे हजर होते.‎

मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले‎ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण‎ करून व दीपप्रज्वलन करून‎ कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात‎ आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक‎ एस.आर. थोरात व जोगेश्वरी‎ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक‎ एस.बी.राऊत होते. क्रिडा स्पर्धा,‎ निबंध स्पर्धा, स्मरण शक्ती स्पर्धा,‎ गणितगती स्पर्धा, वादविवाद स्पर्धा,‎ शिष्यवृत्ती परीक्षेत, दहावी बोर्ड‎ परीक्षेतील गुणवंत, सांस्कृतिक‎ कार्यक्रमातील गुणवंतांचा सत्कार‎ करण्यात आला. हा कार्यक्रम‎ यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षक‎ माचवे, वाव्हळ, सांस्कृतिक विभाग‎ प्रमुख साखरे, क्रिडा विभाग प्रमुख‎ थोरात, कदम, देवकते, ए.बी.‎ देशमुख, अंबाड, जाधव, सोळंके‎ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन आर.आर. देशमुख‎ यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...