आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

35 तासांनंतर केले अंत्यसंस्कार:उपोषणास बसलेले अप्पाराव पवार यांचा उपोषण सुरू असताना झाला दुर्दैवी मृत्यू

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वासनवाडी शिवारातील गायरान जमीन आणि शबरी घरकुल योजनेतील लाभासाठी उपोषणास बसलेले अप्पाराव पवार यांचा उपोषण सुरू असताना रविवारी पहाटे दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा मृत अप्पाराव पवार यांच्या कुटुंबीयांनी घेतला. अखेर सोमवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर पवार कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला. ३५ तासांनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत पवार कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात बसले होते. अखेर सोमवारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पवार कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते, जि.प. सीईओ अधिकारी अजित पवार, अतिरिक्त सीईओ वासुदेव सोळंके यांची बैठक झाली व नंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...