आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक:‘निरंजन’च्या वतीने पाणपोई, तीर्थंकर वननिर्मिती, सामाजिक कार्यकर्ते जयेश कासट यांचे आवाहन

शिरूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निरंजन सेवाभावी संस्था, पुणे यांच्या वतीने शहरासह तालुक्यात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर विविध सामाजिक विकासकामांचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते जयेश कासट यांनी केले आहे. निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने शिरूर शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत जवळपास दीड लाख रुपये किमतीच्या जलशुद्ध करण संयंत्राचे आणि पाणपोईचे उद्घाटन करण्यात येणार आहे. श्री क्षेत्र सिद्धेश्वर संस्थान (धाकटी अलंकापुरी) येथे असलेल्या गोशाळेतील गाईंचे माशा आणि डासांपासून संरक्षण होण्यासाठी शेडनेट उभारण्यात येणार आहे. यासह तागडगांव येथील सर्पराज्ञी प्रकल्पावर पन्नास हजार रुपये खर्च करून २४ जैन तीर्थंकर यांचे आद्य वृक्षांचे “तीर्थंकर वनाची” निर्मिती करण्यात येणार आहे. शनिवारी (ता.२ एप्रिल) सकाळी साडेदहा वाजता जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत कै.भागीरथ छगनीराम कासट यांच्या स्मृती प्रित्यर्थ पाणपोई आणि वॉटर फिल्टर प्लांटचा उद्घाटन सोहळा होणार आहे. सिद्धेश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांच्यासह भीमाबाई कासट, नगराध्यक्ष रोहिदास पाटील गाडेकर, उपनगराध्यक्ष प्रकाश देसरडा यांच्यासह सर्व नगरसेवक यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. शहरासह तालुक्यात होणाऱ्या विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट, आनंद कासट, राहुल कासट यांनी निरंजन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आर्थिक नियोजन केले आहे.

शनिवारी होणाऱ्या सर्व कार्यक्रमांसाठी शिरूर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदमाध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अंकुश शिंदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते जीवन कदम, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...