आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:असंघटित कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणीचे आवाहन

बीड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवण्याच्या उद्देशाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने असंघटित कामगारांची नोंदणी करण्याकरिता ई-श्रम पोर्टलचे उद्घाटन करण्यात आलेले आहे.कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले गेले आहे. सद्यःस्थितीत याअंतर्गत नोंदणीकृत कामगारास प्रधानमंत्री सुरक्षा विमा लागू राहील. नोंदणीकृत कामगारांचा एक वर्षाचा प्रीमियम रु. १२ केंद्र शासनामार्फत भरला जाईल.

असंघटित क्षेत्रात ऊसतोड कामगार, सुतारकाम करणारी व्यक्ती, बांधकाम कामगार, शेतीकाम करणारी व्यक्ती, घरकाम करणारी महिला, आशा सेविका व अंगणवाडी सेविका, ऑटोचालक, रिक्षाचालक, न्हावी कामगार, वृत्तपत्र विक्रेते, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, रस्त्यावरील विक्रेते, पीठ गिरणी चालक, पेंटर, इलेक्ट्रिशियन, प्लम्बर , ब्यूटी पार्लर कामगार महिला, लहान शेतकरी, मनरेगा मजूर, फेरीवाले/भाजीवाला/फळवाले, पशुपालन करणारे कामगार, वीटभट्टी कामगार, माथाडी कामगार, चहा विक्रेते, असंघटित क्षेत्रात वरीलप्रमाणे विविध क्षेत्रातील ३०० कामगार व्यक्तींचा समावेश होतो.

बातम्या आणखी आहेत...