आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्याच्या लोकनेत्या, माजी सार्वजनिक आरोग्य मंत्री कै. डॉ. विमल मुंदडा यांच्या पुढाकाराने लोखंडी सावरगाव येथे सुरू करण्यात आलेल्या वृद्धत्व, मानसिक आजार उपचार व संशोधन केंद्रात अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या ७९ जागा तत्काळ कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या सुचना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. आमदार नमिता मुंदडा मागील दोन वर्षांपासून या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करीत हाेत्या. अखेर त्याला यश आले आहे.
लोखंडी सावरगाव येथे कोट्यवधी रुपये खर्चून बेंगळूरू येथे उभारण्यात आलेल्या वृद्धत्व निवारण मानसिक आजार उपचार व संशोधन केंद्राच्या आधारावर महाराष्ट्रातील एकमेव भव्य महत्वाकांक्षी रुग्णालयाची उभारणी केली. यासाठी आरोग्य विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून इमारतही उभी केली. सदरील इमारत उभारल्यानंतर अनेक वर्षे हे केंद्र सुरु करण्यासाठी आवश्यक कर्मचारीच उपलब्ध नसल्याने ही इमारतीत धुळ खात पडून हाेती. दोन वर्षांपुर्वी काेविड साथ रोगाच्या संक्रमण काळात तत्कालीन सिव्हील सर्जन डॉ. अशोक थोरात यांच्या पुढाकाराने या इमारतीत जम्बो काेविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले.
काेविडची लाट ओसरल्यानंतर या ठिकाणी आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा हे वृद्धत्व निवारण मानसिक आजार उपचार व संशोधन केंद्र व स्त्री रुग्णालय सुरू करण्यात आले. यापैकी या ठिकाणी सुरू असलेल्या वृद्धत्व निवारण मानसिक उपचार व संशोधन केंद्रातील ७९ रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाकडे आ. नमिता मुंदडा यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अलीकडेच राज्यातील सत्तेत बदल होवून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. यानंतर आ. नमिता मुंदडा यांनी रिक्त जागा भरण्यासाठी पुन्हा पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या या मागणीची विशेष दखल घेवून या रिक्त जागा भरण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक हेमंत कुमार बोरसे यांनी काढले आहेत.
अशा पध्दतीने होणार भरती
राज्यातील शासकीय रुग्णालयात ज्या पद्धतीने खासगी एजन्सी मार्फत कंत्राटी पद्धतीने सुरक्षा कर्मचारी भरती केले जातात त्याच पद्धतीने या कुशल आणि अकुशल कामगारांची कंत्राटी पद्धतीने भरती होईल. ही भरतीची सर्व प्रक्रिया सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या वतीने पुर्ण करण्यात येणार अाहे.
या पदांची करणार भरती
या केंद्रातील ७९ रिक्त जागांपैकी ६८ पदे कुशल तर ११ पदे अकुशल कामगारांची आहेत. कुशल कामगारांत २१ अधिपरिचारीकासह आहारतज्ञ, रक्तपेढी तज्ञ, क्ष किरण तज्ञ, ईसीजी तज्ञ, प्रयोगशाळा तज्ञ, नेत्र शल्यचिकित्सक गट ब, नेत्र चिकित्सा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आयुष, वैद्यकीय अधिकारी होमिओपॅथिक, वैद्यकीय अधिकारी युनानी, योगा व नेपॉथिस्ट, कनिष्ठ लिपिक,२ बाह्यरुग्ण लिपीक, २ शिपाई, बाह्य रुग्ण सेवक, ३ अपघात रुग्ण सेवक, रक्तपेढी परिचर, शस्त्रक्रिया गृह परिचर, व्रण उपचारक,१४ कक्ष सेवक यांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.