आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामपंचायत निवडणूकीत बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचे प्रकार जिल्ह्यात समोर आले. याप्रकरणी शिरुर, आष्टी आणि माजलगाव पोलिसांत चार जणांविरोधात गुन्हा नोंद केला.
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया शांतते पार पाडण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त बंदाेबस्त देऊन झोन पेट्रोलिंगही अधिकाऱ्यांकडून केली जात होती. आष्टी तालुक्यातील बांदखेल मतदान केंद्रावर झोन पेट्रोलिंग करणारे पोलिस उपनिरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांना पोपट भिमराव परभणे याने मतदान केंद्रात जाण्यापासून राखले व शिविगाळ केली.
या प्रकरणी त्याच्या विरोधात आष्टी पोलिसंात गुन्हा नोंदवला गेला.तर, शिरुर तालुक्यातील जाटनांदूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सवसवाडी येथील मतदान केंद्रावर शिरुर पोलिस ठाण्याचे कर्मचारी हनुमंत महादेव साळुंके हे बंदोबस्तावर होते. यावेळी १००मिटरच्या आतमध्ये थांबलेल्या देविदास महादेव घायाळ याला त्यांनी नियंत्रण रेषेच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यावर त्याने हुज्जत घातली. याप्रकरणी त्याच्यावर शिरुर पेलिसांत गुन्हा नोंदवला गेला.
पायतळवाडीत मारहाण
तिसरी घटना माजलगाव तालुक्यात पायतळवाडी मतदान केंद्रावर घडली. गणेश नांगरे हे पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर असताना १०० मिटरच्या आतमध्ये थांबलेल्या बालाजी लक्ष्मण गडदे याला त्यांनी बाहेर जाण्यास सांगितले त्याने नकार दिल्यानंतर सहकाऱ्याला त्याला पकडण्यास सांगितले यावर बालाजीची पत्नी दैवशाला हिने नांगरे यांना मारहाण केली. या प्रकरणी दांपत्यावर माजलगाव ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.