आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सशस्त्र हल्ला:बीड तालुक्यामध्ये पराभूत उमेदवारावर सशस्त्र हल्ला, माळापुरीत चार जण जखमी झाल्याचे उघड

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायतींचे निकाल लागल्यानंतर आता गावपातळीवर वाद समोर येऊ लागले आहेत. बीड तालुक्यातील माळापूरी येथे पराभूत उमेदवारासह इतरांवर सशस्त्र हल्ला करण्यात आला. यात, दोन ते चार जण जखमी झाले आहेत. तर, नांदुर हवेलीत पराभूत उमेदवाराच्या घरासमोर गुलाल उधळून विनयभंग करत जातीवाचक शिविगाळ केली गेली. दोन्ही प्रकरणात बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकांमधील धुसफूस समोर येऊन वाद हाेऊ लागले आहेत. बीड तालुक्यातील माळापूरी येथे मंगळवारी पराभूत आणि विजयी गट समोरासमोर आले. पराभूत गटातील सरपंचपदाच्या उमेदवार सलीमाबी दाऊद बेग (५५), त्यांचा मुलगा नझीम बेग दाऊद बेग (३१) आणि हारुण इस्माईल पठाण (३८) यांच्यावर सशस्त्र हल्ला केला गेला. कुकरीसह अन्य धारदार शस्त्राने वार केल्याने यात तिघे गंभीर जखमी झाले. तर, समाेरच्या गटातील नवनिर्वाचित सरपंच अशोक ढास हेही जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत याप्रकरणात गुन्हा नोंद नव्हता. जबाब घेण्याचे काम सुरु असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे यांनी सांगितले. तर, दुसऱ्या घटनेत बीड तालुक्यातील नांदुर हवेली येथे विजयी गटाने गुलाल उधळून जल्लोष करताना एका महिलेचा विनयभंग करुन जातीवाचक शिविगाळ केल्याची तक्रार महिलेने बीड ग्रामीण ठाण्यात दिली यावरुन शेख शाहेद शेख मुजफ्फर, शेख आमेर शेख अन्सार, शेख रियाज शेख रज्जाक, शेख राजू शेख बाबू, शेख शाकेर शेख इसाक, गणेश बुधनर, शेख िसराज, पठाण रियाज यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला.

बातम्या आणखी आहेत...