आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतीचिन्ह:आज सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ ; वीरपत्नी यांचा करण्यात आला सत्कार

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सशस्त्र सेना ध्वजदिन २०२२ निधी संकलनाचा शुभारंभ आणि ध्वजदिन निधी २०२१ चे उत्कृष्ट संकलन करणाऱ्या संस्था, कार्यालये यांना स्मृतीचिन्ह वितरण आणि वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष सशस्त्र सेना ध्वजदिन निधी समितीचे अध्यक्ष राधाबिनोद शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी कळवले आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, पोलीस अधीक्षक ठाकुर तसेच वीरमाता, वीरपत्नी, अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...