आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोडरोमिओं:माजलगाव  येथे रोडरोमिओंचा बंदोबस्त करा;  सेनेची मागणी

माजलगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव शहरात विविध शाळा, महाविद्यालयांत ग्रामीण भागातून तसेच शहरातून येणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रमाण मोठे आहे. गरीब व होतकरू विद्यार्थीनी शिक्षणासाठी बस आणि खासगी वाहनाद्वारे विविध शाळा कॉलेजमध्ये ज्ञानार्जन करण्यासाठी येतात. परंतु काही टवाळखोर आणि गुंड प्रवत्तीची मुले मुलींची छेड काढतात. या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी शिवेसना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केली.

पोलिस प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की श्री सिद्धेश्वर विद्यालय, महाविद्यालय, महात्मा फुले शाळा, जि.प. कन्या शाळा, सुंदराव सोळंके महाविद्यालय या परिसरात मोठ्या प्रमाणात टवाळखोर जमा होऊन येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थिनींची आणि महिलांची छेड काढतात. अशा रोड रोमियोचा तात्काळ बंदोबस्त करावा. जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक माजलगाव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके, विधानसभा समन्वयक दासू पाटील बादाडे, उपतालुकाप्रमुख अतुल उगले, माजी नगरसेवक शिवमुर्ती कुंभार, थळेकर, बाळासाहेब मेंडके, कल्याण बल्लाळे, प्रदीप तांबे, अभिजीत देडे हजर होते.

बातम्या आणखी आहेत...