आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीसीसी बँक अपहारप्रकरणी 179 जणांविरुद्ध अटक वॉरंट:वडवणी न्यायालयात हजर राहत नसल्याने वॉरंट

वडवणी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०१३ च्या अपहार प्रकरणातील १७९ आरोपींच्या विरोधात वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात करण्यात आले. हे आरोपी वडवणी न्यायालयात हजर राहत नसल्याने येथील न्यायालयाने संबंधित आरोपींविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. तीन आरोपींना वडवणी पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक आनंद कांगुणे यांनी दिली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत २०१३ मध्ये कोट्यवधींचा अपहार झाला होता. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन प्रशासक शिवानंद टाकसाळे यांच्या आदेशानुसार, तक्रार देण्यात आली होती. त्याप्रमाणे वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आरोपी न्यायालयात हजर राहुन न्यायालयीन कामकाजात सहकार्य करत नसल्याने वडवणी न्यायालयाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला व वडवणी तालुक्यातील १७९ जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. त्यानंतर पोलिसांनी सर्वांचा शोध सुरू केला. त्यातील तिघांना वडवणी पोलिसांनी ताब्यात घेतले. उर्वरित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी वडवणी पोलीसांचे पथक रवाना झाले आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. या प्रकरणात उर्वरित आरोपींमध्ये वडवणीतील मोठ्या राजकीय नेत्यांचा समावेश असल्याने एेन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उर्वरीत आरोपींना ताब्यात घेण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद कांगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय एन.आर.ढाकणे, पो.ह.ए.पी.कापले, पो.ह.ए.बी.तांदळे, पो.ना. ए.एन.अघाव, पो.ना.विलास खरात, पो.ना. अशोक केदार, पो.ना. महेश गर्जे, पो.कॉ. नितिन काकडे यांचे पथक रवाना झाले आहे. लवकरच आरोपी गजाआड करण्यात यश मिळेल, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...