आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:गर्भलिंगनिदान प्रकरणात अटकत; सोनोग्राफीची कागदपत्रे सापडलेल्या दोन c नाही

बीड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्भलिंगनिदान प्रकरणात अटक करण्यात आलेली अंगणवाडी सेविका मनीषा सानप हिच्या घरझडतीत दोन महिलांच्या सोनोग्राफीची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. या दोन्ही महिलांना आधीच्या मुली आहेत. त्यामुळे या महिलांनीही सानपकडे येऊन गर्भलिंगनिदान केल्याचा संशय आहे. दरम्यान, चार दिवस उलटूनही पोलिसांनी अद्याप या दोन महिलांची साधी चौकशीही केली नसल्याचे समोर आले आहे. कासवगतीच्या तपासाने गर्भलिंगनिदानाची पाळेमुळे कशी शोधली जाणार हा प्रश्न आहे.

सीताबाई गाडे या गर्भवतीच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात गर्भलिंगनिदान होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथील अंगणवाडी सेविका मनीषा सानप हिच्या घरावर पोलिस व आरोग्य विभागाने धाड टाकली होती. यात गर्भपाताचे साहित्य, गोळ्या, सोनोग्राफीसाठी लागणारे जेल व २९ लाखांची रोकड जप्त केली गेली होती. दरम्यान, पोलिसांच्या पंचनाम्यानुसार मनीषा सानपच्या घरात दोन महिलांच्या सोनोग्राफीची कागदपत्रेही सापडली आहेत.

यातील एक महिला माजलगाव तालुक्यातील आहे. या महिलेला यापूर्वीच्या दोन मुली असून तिसऱ्या वेळी ती गर्भवती होती. दुसरी महिला ही मनीषा सानपची बहीणच असल्याचे सानपने पोलिसांना त्या वेळी सांगितले होते. या महिलेलाही पहिली मुलगी होती. दुसऱ्यांदा ती गर्भवती होती.मात्र, या दोन्ही महिलांचे सोनोग्राफीचे पेपर मनीषा सानपकडे कसे आले हा प्रश्न आहे. या दोघींनीही मनीषाच्या मदतीने गर्भलिंगनिदान केले होते का? त्या गर्भवती होत्या तर त्यांचे पुढे काय झाले? आता तो गर्भ आहे की त्या प्रसूत झाल्या की त्यांचा गर्भपात झाला? त्यांना मनीषा सानपकडे पाठवणारा आणखी कुणी एजंट होता का याची साधी माहितीही अद्याप ना पोलिसांनी घेतली आहे ना आरोग्य विभागाने. केवळ गर्भलिंगनिदान करणारा डॉक्टर अटक करणे बाकी असल्याचे सांगत तपास थंडावला आहे. त्यामुळे अशा कासवगतीने गर्भलिंगनिदानाचे सगळे रॅकेट कसे समोर येणार आणि पाळेमुळे शोधणार कशी हा प्रश्न आहे.

डॉक्टरच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत
दोन महिलांची सोनोग्राफीची कागदपत्रे सापडलेली आहेत, मात्र अाम्ही अद्याप त्यांची चौकशी केलेली नाही. डॉक्टरच्या अटकेचे प्रयत्न सुरू असून तो अटक झाल्यानंतर आणखी काही बाबी समोर येऊ शकतात.-संतोष वाळके, पोलिस उपअधीक्षक, बीड

तो’डॉक्टर पोलिसांना सापडेना
गर्भपात प्रकरणातील ‘त्या’ डॉक्टरच्या मागावर पोलिस असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्यापही तो डॉक्टर पोलिसांना सापडला नाही. डॉक्टरला ताब्यात घेतल्यानंतर याप्रकरणात आणखी काही उघडकीस येण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...