आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:खूनप्रकरणी अटक; दोघांना 10 दिवसांची पोलिस कोठडी

बीड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१ कोटीच्या विम्यासाठी पतीच्या खूनाची सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला होता. यात पत्नीसह दोन जणांना सुरुवातीला अटक केली होती. त्यानंतर आणखी दोन जणांना गजाआड केले. दोघांना न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिली. मंचक पवार यांचा १ कोटी रुपयांच्या विम्यासाठी चक्क पत्नीनेच १० लाख रुपयांची सुपारी देऊन खून केला होता. खून लपवण्यासाठी अपघाताचा बनावदेखील केला गेला होता.

या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत या प्रकरणाचा छडा लावला होता. दरम्यान, दोन जण फरार होते. बीड ग्रामीण पोलिसांनी नाशीकमधून भाऊसाहेब उर्फ बंडू दशरथ नवले व रामेश्वर राऊत या दोघांना अटक केली. त्यांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आता अटकेतील आरोपींची संख्या पाच झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...