आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:शेतकऱ्याला अडवून लुटणाऱ्यांना अटक, त्यांच्याकडून मोबाइल व रक्कम हस्तगत

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यास रस्त्यात अडवून दोन मोबाइलसह ४९ हजार ५०० रुपयांची रक्कम लांबवल्याची घटना केज शहरात घडली होती. केज पोलिसांनी याप्रकरणी दाेघांना अटक करून त्यांच्याकडून मोबाइल व रक्कम हस्तगत करून शेतकऱ्याला सुपूर्द केली आहे.

धर्माळा येथील शेतकरी दिनकर सखाराम गोडसे ( ४५ ) यांनी कोबी विक्री करून त्यांच्या हाती ४९ हजार ५०० रुपये आले होते. ही रक्कम घेऊन २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ते केज येथील आदित्य कृषी सेवा केंद्राचे दुकानदार विलास जाधव यांची उधारी देण्यासाठी आले होते. दुकादार दुकानावर नसल्याने आठवडी बाजारातून भाजीपाला घेऊन सायंकाळी ते गावाकडे निघाले होते.

बातम्या आणखी आहेत...