आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:दादेगाव येथे कृषिदूतांचे आगमन; शेतकऱ्यांना मार्गदर्शन

आष्टीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील दादेगाव येथे श्री. छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकर, कृषी महाविद्यालय आष्टी येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी कृषिदूत यांचे दादेगाव या गावात आगमन झाले आहे. या वेळी कृषिदूत, शुभम पताळे, आकाश पाटील, प्रशांत माने, शिवम शिंदे, प्रविण साबळे, अविनाश बरळ,रोहित वाघमारे, ओम हावळे, आकाश सुर्यवंशी, भगवान सूर्यवंशी यांचे शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वागत केले.

प्राचार्य डॉ. श्रीराम आरसूळ व प्रा. तांबोळी एम आय यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२२-२३ याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली हे कृषी दुत शेतकऱ्यांना तीन महिने गावकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन करणार आहेत या वेळी, सरपंच सौ. अरुणाबाई गिते,उपसरपंच सौ. मंदा बंडाले, ग्रामसेवक श्री. जी.एन. गिरी, विजय पोटे, गणेश गरुड, कार्यक्रम अधिकारी प्रा.देसाईपाटील एस. आर. तसेच शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

बातम्या आणखी आहेत...