आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:मांडवा येथे कृषिदूतांचे आगमन; केले वृक्षारोपण

आष्टीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी तालुक्यातील मांडवा येथे श्री. छत्रपती ,शाहू, फुले, आंबेडकर, कृषी महाविद्यालय आष्टी येथील चतुर्थ वर्षातील विध्यार्थी कृषीदूत यांचे मांडवा या गावात आगमन झाले आहे. या वेळी कृषीदूत उत्कर्ष गाजरे, अभिषेक घोलकर, दिग्विजय वसेकर,ओंकार माने ,दिपक पवार, कृष्णा तौर,शिवराज गाजरे, योगेश भुसारे,शुभम कांबळे,अभिजीत चव्हाण, यांचे शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन स्वागत केले. मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी दूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२२-२३ याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली हे कृषी दुत शेतकरी यांना दोन महिने गावकऱ्यांना शेति विषयी मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी,सरपंच अशोक मुटकुळे,उपसरपंच युवराज मुटकुळे, तसेच शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच त्यांच्या उपस्थितीत पर्यावरण दिवसाचे महत्त्व सांगून झाडे लावून पर्यावरण दिन साजरा केला.त्यावेळी वृक्षारोपण करताना सरपंच, दिल्लीप मुटकुळे (माजी सैनिक), रावसाहेब मुटकुळे,अभिषेक श्रीखंडे,महेश मुटकुळे तसेच इतर ग्रामथ उपस्तिथ होते.

बातम्या आणखी आहेत...