आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजपुरवठा:पंकजा मुंडे यांनी झापताच झाला वीजपुरवठा  सुरळीत

परळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वीजपुरवठा शनिवारी रात्रीपासून बंद झाल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. ऐन सणासुदीत वीज गुल झाल्याने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी रविवारी सकाळी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दांत झापले. यानंतर कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेत वीजपुरवठा सुरळीत केला. गणेशोत्सव आणि महालक्ष्मीचा सण असल्याने सर्व घरांमध्ये धामधूम आहे.

अशातच शनिवारी रात्रीपासून शहरातील वीज अचानक खंडित झाली. महालक्ष्मीची आरास, सजावट, देखावा, गणेशाची पूजा, आरती करताना वीज खंडित झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. रात्रीपासून गेलेली वीज रविवारी दुपारी १२ वा.पर्यंत आली नाही. हा सर्व प्रकार कानावर जाताच पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ऐन सणासुदीत नागरिकांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही, असा कडक शब्दांत इशारा दिल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले दुपारी वीजपुरवठा सुरळीत केला.

बातम्या आणखी आहेत...