आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न मार्गी:अधिकाऱ्यांना धारेवर धरताच शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न मार्गी

दिंद्रूड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलगाव, दिंद्रुड पंचक्रोशीतील आदी गावच्या शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नांसंदर्भात भाजप नेते रमेश आडसकर यांनी तेलगाव येथील वीज कंपनी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरताच शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न मार्गी लागला.

गुरुवारी येथील वीज कार्यालयात शेतकऱ्यांसोबत आडसकर गेले होते. त्यावेळी त्यांच्या हाबाडा स्टाइलने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली व शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. माजलगाव व धारुर तालुक्यातील वांगी, फ. जवळा, बाभळगाव, चाटगाव, देवदहिफळ, दिंद्रुड, निञुड, तेलगाव आदि गावात गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा प्रश्न शेतकरी व नागरिकांना सतावत आहे. त्यातच गेल्या कांही दिवसापासुन पावसाने उघडीप दिल्याने पाण्याअभावी पिके करपु लागली आहेत. शेतकऱ्यांच्या विहीर, बोअरला पाणी असले तरी वेळेला विज उपलब्ध होत नसल्याने पाणी असुन ही देता येत नाही.

याबाबत शेतकऱ्यांनी विज कंपनीच्या अधिकाऱ्यांना विज सुरळीत देण्याची मागणी करुन, अधिकारी, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने, शेतकऱ्यांनी रमेश आडसकर यांच्याकडे तक्रार करताच आडसकर यांनी या सर्व गावच्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन महावितरण च्या उपविभागीय कार्यालयास भेट देऊन, अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधला. यात लोडशेडिंग व्यतिरिक्त विज पुरवठा खंडित करू नये, जळालेले डब्बे बदलावेत, वाढीव विज बील तत्काळ दुरूस्त करून जे आहे तेच बील घेणे. आदि मागण्यांबाबत आडसकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शेतकरी व नागरिकांच्या भावना सांगितले.रूा उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्व मागण्या तत्काळ मान्य केल्या.

बातम्या आणखी आहेत...