आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांडवा दुरुस्त:तहसीलदार, एसडीएमच्या सूचना येताच तलावाचा सांडवा दुरुस्त

दिंद्रुड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर तालुक्यातील चाटगाव येथील तलावाचा सांडवा फोडल्याचा प्रकार उघडकीस आल्यांनतर तहसिलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सुचनेनंतर सदरील तलावाचा सांडवा पाटबंधारे विभागाच्या शाखाधिकाऱ्यांनी तातडीने दुरूस्त केला आहे.

अज्ञाताने चाटगाव येथील तलावाचा सांडवा फोडल्यानंतर धारूरचे तहसिलदार रामेश्वर स्वामी व पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी बालाजी नंदवते यांनी शाखाधिकाऱ्यास अज्ञातावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान शाखाधिकारी शेख वामीक यांनी दिंद्रुड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिल्यांनतर गुन्हा दाखल झाला. दरम्यान शेख यांनी कर्मचाऱ्यांना सांगुन स्वतः उभे राहून सांडव्याची दुरुस्ती करून घेतली आहे. त्यामुळे अपव्यय होणाऱ्या लाखो लिटर पाण्याची बचत झाली आहे. चाटगाव तलावाचा सांडव्या प्रकरणी आम्ही तातडीने आदेश देऊन सांडव्याची दुरुस्ती करून घेतली आहे. यंदा मंजुरी मिळाल्यास तलावाची कायमस्वरूपी दुरुस्ती करणार असल्याचे पाटबंधारेचे उपविभागीय अधिकारी बी. एस. नंदवते यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...