आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरवली शाळा:शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी झेडपीच्या सीईओंच्या दालनासमोर भरवली शाळा

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई तालुक्यातील चकलांबा जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या दालनासमोरच विद्यार्थ्यांनी गुरुवारी (ता.१२ डिसेंबर) शाळा भरवत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध नोंदवला. १९ डिसेंबरपर्यंत रिक्त जागा भरून मुलांना शिक्षक दिले जातील, असे आश्वासन शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिले.

गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेत एकूण ९१० विद्यार्थी शिक्षण घेत असून नववी आणि दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३२० इतकी आहे. दरम्यान, शाळेत मुख्याध्यापक १ , पर्यवेक्षक १, माध्यमिक शिक्षक ४, प्राथमिक पदवीधर २, सहशिक्षक २ आणि सेवकाचे ३ असे एकूण ११ पदे रिक्त आहेत. तर, सप्टेंबर महिन्यांत शिक्षण विभागाने केलेल्या समायोजनातून दिलेल्या ४ शिक्षकांपैकी केवळ १ शिक्षक रुजू झालेला आहे. नववी, दहावीच्या वर्गांमध्ये विज्ञान आणि गणित या महत्वाच्या विषयांसाठीही शिक्षक नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.

बातम्या आणखी आहेत...