आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवी प्रदान‎:अशाेकनगर जि.प.शाळेतील शिक्षक‎ सखाराम शिंदेंना पीएचडी पदवी प्रदान‎

बीड5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा‎ अशोकनगर, बीड येथे कार्यरत शिक्षक सखाराम‎ शहादेव शिंदे यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर‎ मराठवाडा विद्यापीठाने मराठी विषयात पीएचडी पदवी‎ प्रदान केली. सखाराम शिंदे यांनी बलभीम‎ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.गणेश मोहिते यांच्या‎ मार्गदर्शनात //"नव्वदोत्तर मराठी कथेचा अभ्यास//" या‎ विषयावर आपला शोधप्रबंध विद्यापीठास सादर केला‎ होता.

डॉ.गणेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली‎ संशोधन पुर्ण करणारे हे दुसरे संशोधक विद्यार्थी आहे.‎ सखाराम शिंदे यांच्या या यशाबद्दल बलभीम‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सानप, उपप्राचार्य‎ डॉ.गणेश मोहिते, मराठी संशोधन केंद्रप्रमुख डाॅ.‎ मनोहर सिरसाट, प्रा. महारूद्र जगताप, प्रा. संदीप‎ परदेशी, प्रा. व्यंकटेश राऊत, पंचायत समिती‎ गटशिक्षणाधिकारी एस. एस. टेकाळे, विस्तार‎ अधिकारी एस. बी. माटे, केंद्रप्रमुख फेरोजखान‎ पठाण, मुख्याध्यापक शेख मुसा यांनी अभिनंदन केले‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...