आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:मारहाणीचा जाब विचाल्याने कुऱ्हाडीने डोके फोडले, तिघांवर गुन्हा दाखल

बीड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावाला मारहाण का केली याचा जाब विचारणाऱ्याचे कुऱ्हाडीने डोके फोडल्याची घटना धारूर तालुक्यातील घागरवाडा येथे घडली. या प्रकरणी तीन जणांविरोधात धारूर पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

सुनिल श्यामराव नागरगोजे असे डोके फोडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अमर लक्ष्मण नागरगोजे हे त्यांचे शेतातील शेजारी असून त्यांनी सुनिल यांच्या मोठ्या भावाच्या डोळ्यात चटणी टाकून मारहाण केली होती. सुनिल यांनी २० एप्रिल रोजी याचा जाब विचारला. यावेळी अमर यांच्यासह बाळूबाई अमर नागरगोजे व प्रकाश लक्ष्मण नागरगोजे यांनी सुनिल यांना शिविगाळ करुन कुऱ्हाडीने त्यांच्यावर हल्ला केला. यात सुनील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांनी या प्रकरणी धारूर पोलिसांत तक्रार दिली असून अमर नागरगोजे, बाळूबाई नागरगोजे, प्रकाश नागरगोजे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...