आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याला ७५ वर्ष उलटली तरी तालुक्यातील काळ्याचीवाडी आणि मांजर कडा तांडा या वाड्यावर बस पोहोचली नव्हती. या गावासाठी पूर्वी गाडी रस्ता होता परंतु मागील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये पंतप्रधान सडक योजनेतून डांबरी रस्ता करण्यात आल्यामुळे स्वातंत्र्यानंतर या गावातून आता लालपरी धावू लागली आहे. गावात पहिल्यांदा बस आल्यानंतर गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. धारूर तालुका हा बालाघाटाच्या डोंगररांगांनी व्यापलेला आहे.
गावासाठी मजबूत रस्ते नसल्यामुळे दळणवळणाच्या सुविधा पाहिजे तशा झालेल्या नाहीत. परंतु आता हळूहळू यामध्ये सुधारणा होऊन '' डोंगराच्या कुशीत वसलेले तांडे, वस्त्या, गावे ही डांबरी रस्त्याने तालुक्याला जोडण्यात येत आहेत. तालुक्यातील कळ्याचीवाडी, मांजरकडा तांडा ही गावे बालाघाटाच्या डोंगर कुशीत वसलेली आहे. येथे दळणवळणाची सुविधा नसल्यामुळे पायवाट किंवा गाडी रस्त्याशिवाय मजबूत रस्ता नव्हता.
पंधरा वर्षे नंतर या ठिकाणी साधारण डांबरीकरण करण्यात आले होते परंतु या गावासाठी जाणाऱ्या नदी नाल्यावर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात येथील ग्रामस्थांचे दळण वळणासाठी मोठे हाल होत होते .या ठिकाणी पंतप्रधान सडक योजनेतून भोगलवाडी ते सावरगाव असा आठ कोटीच्या जवळपास पुलासह डांबरीकरणाचा रस्ता मंजूर झाला होता. या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे.
या रस्त्यावरून भोगलवाडी सह काठेवाडी, काळ्याचीवाडी, मांजरकडा तांडा, पिंपरवडा, असोला ही गावी जोडण्यात आलेली आहेत. रस्ता झाल्यामुळे येथील नागरिकांनी बस सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. एक फेब्रुवारी बुधवारपासून धारूर, असोला, पिंपरवाडा, काळ्याचीवाडी, भोगलवाडी, काठेवाडी मार्गे तेलगाव ही बस सुरू करण्यात आलेली आहे. ही बस प्रथमच मांजरकडा तांडा आणि काळ्याचीवाडी या गावातून जात आहे.
प्रथमच लालपरी धावली पंधरा वर्षांपूर्वी या रस्त्यावर मोठे नाले असल्यामुळे दळणवळण करणे कठीण होते . आता लहान मोठे पुल उभा करण्यात डांबरीकरण झाले आहे . दोन दिवसापासून बस सुरू करण्यात आली . परमेश्वर तिडके , ग्रामस्थ
आता दळणवळणाची सोय झाली धारूर -पिंपरवाडा - भोगलवाडी या मार्गावरून पूर्वी कधीही बस जात नव्हती . आता रस्ता झाल्यामुळे आम्ही बस सुरू करण्यात आलेली आहे .भोगलवाडी तसेच काळेवाडी येथील ग्रामस्थांना आता जवळचे अंतर झाले आहे . - शंकर स्वामी , आगर प्रमुख धारूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.