आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:बीडमध्ये क्लासचालकाकडून दुसऱ्यावर प्राणघातक हल्ला; कानशिलावर लावले पिस्टल, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीडमध्ये कोचिंग क्लास वॉरमधून एका क्लासचालकाने दुसऱ्यावर प्राणघात हल्ला केला तसेच कानशिलावर गावठी कट्टा लावून जिवे मारण्याची धमकीही दिली. गुरुवारी हा प्रकार घडला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी हर्षल भास्कर केकाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पांगरी रोड परिसरात ११ वी आणि १२ वीचे गणित विषयाचे क्लासेस आहेत. ज्या इमारतीत केकाण यांचे क्लास चालतात त्याच इमारतीत खाली पंकज तांबारे यांचेही भौतिकशास्त्राचे क्लास आहेत. २० जानेवारी रोजी पंकज यांनी केकाण यांच्या घरी येऊन ‘तू माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसरीकडे क्लास लावा असे का सांगतो?’ असे म्हणत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती.

तांबारेच्या हल्ल्यातून केकाण बचावले
त्यानंतर गुरुवार, २ फेब्रुवारी रोजी हर्षल केकाण हे आपल्या क्लासच्या कार्यालयात असताना सकाळी ११ वाजता पंकज तांबारे व श्रीनिवास तांबारे हे कार्यालयात आले. त्यांनी केबिन बंद केली आणि याच कारणावरून त्यांनी केकाण यांच्याशी वाद घातला. या वेळी पंकज तांबारे याने केकाण यांच्यावर चाकूहल्ला केला. मात्र तो चुकल्याने केकाण वाचले. श्रीनिवास याने त्याच्याजवळील गावठी पिस्टल लावून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पाेलिसांत दोन जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...