आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचा हात:शांतिवनला केलेली मदत वंचितांशी नाळ जोडणारी; पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे प्रतिपादन

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

“जेव्हा आपण काही देत असतो तेव्हा देण्यासारखे खूप काही परमेश्वर आपल्या हातामध्ये टाकत असतो कारण आपल्याला नेहमीच देता येत राहावं मुंबईकरांनी आनंदवन मित्रमंडळाच्या माध्यमातून शांतिवनला दिलेला मदतीचा हात हा वंचित, शोषितांच्या वेदनेशी नातं जोडणारा आणि सामाजिक भान असल्याची कृती करणारा सामाजिक सहभाग आहे या पुण्यकर्माची परतफेड परमेश्वर आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून करत असतो असे प्रतिपादन ज्येष्ठ नेत् शल्य विशारद पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.

आनंदवन मित्रमंडळाने शिरूर तालुक्यातील आर्वी येथील शांतिवनसाठी आयोजित केलेल्या निधी अर्पण सोहळ्यात केले.’याप्रसंगी मेळघाटातील ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. रवी कोल्हे, स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, आनंदवन मित्रमंडळाचे अध्यक्ष नरेंद्र मेस्त्री, शालन मेश्री, शांतिवनचे संस्थापक दीपक नागरगोजे, प्रफुल्ल पुरंदरे, सिद्धाराम बंडगर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी म्हणाले, शांतिवन स्नेहालयसारख्या संस्था महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आपापल्या परीने समाजातील वंचित घटकांच्या निर्माण झालेल्या प्रश्नांवर उत्तर शोधण्याचं काम करीत आहेत.

या कामाला आर्थिक सहयोग देऊन हत्तीचं बळ देण्याचं काम आपल्यासारखी मंडळी करीत असल्यानेच ही कामे सुरू आहेत.वंचित घटकातील पीडितांचे अश्रू पुसण्याचे काम करणे शक्य होत आहे. तर आनंदवन मित्रमंडळाचे अध्यक्ष नरेंद्र मेस्त्री यांनी बाबा आमटे यांनी घालून दिलेला आदर्श घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या शांतिवन सारख्या संस्था म्हणजे बाबा आमटे यांच्या आनंदवनाची प्रकाशाची बेटे निर्माण झाली आहेत. आनंदवनाची बेटे निर्माण व्हावी ही बाबा आमटे यांची संकल्पना या संस्थांच्या रूपाने प्रत्यक्षात येत आहे. या संस्थांच्या पाठीशी आपण मदतीचा हात उभा केला ही खूप मोठी गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

अनाथांच्या डोक्यावर छतासाठीची ही मदत मोलाची

याप्रसंगी व्यक्त होताना दीपक नागरगोजे म्हणाले, ‘शांतिवन दुष्काळग्रस्त भागांमध्ये काम करते. जवळ कुठलेही मोठे शहर नाही, उद्योग नाहीत, देणगीदार नाहीत अशा परिस्थितीत इथे काम करणे जिकिरीचे आहे. अनाथ मुलींच्या डोक्यावर छत उभे करण्यासाठी आनंदवन मित्रमंडळाच्या माध्यमातून मुंबईकरांनी केलेली मदत मोलाची आहे.’ यावेळी मान्यवरांच्या हस्ते ३५ लाखांचा धनादेश शांतिवनकडे सुपूर्द करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...