आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंबित:सहायक समाजकल्याण आयुक्त मडावी निलंबित; 3 टक्के राखीव निधीत अपहार केल्याचा ठपका

बीड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत ३ टक्के राखीव निधीत बीडच्या समाजकल्याणचे सहायक आयुक्त व इतर कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याची तक्रार ‘वंचित’चे अजय सरवदे यांनी औरंगाबाद प्रादेशिक उपायुक्तांकडे केली होती. या तक्रारीची सखोल चौकशी करून राज्याचे सहसचिव दि. रा. डिंगळे यांनी बीडचे सहायक समाजकल्याण आयुक्त सचिन मडावी यांना निलंबित केले.

येथील समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त मडावींंनी शासन निर्णयांचे व खरेदी प्रक्रियेचे पालन न करता खरेदी केल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने विभागीय चौकशी करण्यासाठी औरंगाबाद येथील प्रादेशिक उपायुक्तांनी पुण्याच्या आयुक्तांकडे शिफारस केली होती. चौकशी समितीच्या शिफारशीनुसार पुण्याच्या समाजकल्याण आयुक्तांनी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग मंत्रालय मुंबईचे प्रधान सचिव यांना १८ नोव्हेंबर २०२० रोजी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करून एकत्रित विभागीय चौकशी करण्यासाठी शिफारस केली होती.

१८ नोव्हेंबर २०२० च्या पत्रांमध्ये विभागीय चौकशी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा स्पष्ट अभिप्राय असताना कुठलीही कारवाई होत नव्हती. दरम्यान, सरवदेंनी औरंगाबाद खंडपीठात अॅड. महेंद्र गंडलेंमार्फत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावली होती. ३ डिसेंबर २०२१ रोजी सुनावणी झाली. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग मंत्रालय मुंबईचे प्रधान सचिव यांना समाजकल्याण सहायक आयुक्त व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या व विभागीय चौकशीच्या प्रस्तावावर ६ महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले होते.

बातम्या आणखी आहेत...