आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:तहसीलदारांचे आश्वासन गंगावाडीकरांचे उपोषण मागे; आमदार लक्ष्मण पवार  उपोषणात

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील गंगावाडी येथील गोदावरी नदीच्या पात्रात भर दिवसा होत असलेल्या वाळू उपशाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गुरूवार २ जुन २०२२ रोजी उपोषण सुरू केले होते. दरम्यान भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी भेट देवुन उपोषणात प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी उपोषणस्थळी भेट देत आमदार लक्ष्मण पवार यांनी ग्रामस्थांशी बोलतांना सांगीतले की, तुम्ही तुमच्या मागण्यावर ठाम रहा मी तुमच्या पाठीशी उभा असुन तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही गंगावाडीतील वाळू टेंडर रद्द होत नाही.

तोपर्यंत मी तुमच्या सोबत राहील.येथील टेंडर करताना ग्रामसभेचा बोगस ठराव दिला असल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले असल्याने याची चौकशी होणे आवश्यक आहे. गंगावाडी गोदापात्रात पाणी असतांना येथील टेंडर कसे झाले? ३१ मे रोजी येथील टेंडर रद्द केले जावे म्हणून ठराव घेण्यात आला. तहसीलदार सचिन खाडे यांनी ग्रामस्थांना उपोषण करू नये म्हणून पत्र दिले आहे परंतु येथील टेंडर झाले आहे. दोन टेंडर होते

त्यामध्ये सर्व्हे नंबर २८३,२८४,३२९, मध्ये वाळू उत्खनन करण्यासाठी ताबा देण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात सर्वे नंबर ३५४ मधुन बेकायदा वाळू उत्खनन होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असल्याने दरम्यान २ जुन २०२२ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन २४ तासांत चौकशी समिती नेमण्यात येवुन समितीच्या अहवाला नुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

या वेळी माजी जि. प. सदस्य अँड सुरेश हात्ते, दादासाहेब गिरी, पठाण, पं. स. सदस्य प्रा. शाम कुंड, उद्धव मडके, शरद मोटे, बंडू यादव,दुरेश चिकणे, नामदेव कांबीलकर, हनुमंत चिकणे, श्रीराम जाधव, रामेश्वर मस्के, भाऊसाहेब यादव, देविदास फलके, कृष्णा मोरे, सुरेश पवार, विठ्ठल हात्ते, दत्ता हात्ते, शेख निजाम,शेख नसीर,शेख इर्शाद, पिंटु साळवे आदी उपस्थीत होते.

बातम्या आणखी आहेत...