आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:बीड येथे गुरुवारी अथर्वशीर्ष पठणाचा उपक्रम, महिलांना सहभागाचे आवाहन

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सहा दशकांची परंपरा असलेल्या बीड शहरातील आझाद हिंद गणेश मंडळाच्या वतीने विविध नेहमीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा केला जात असून गुरुवारी (ता.८ सप्टेंबर) महिलांसाठी सामुदायिक गणपती अथर्वशीर्ष पठणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरातील मानाचे गणेश मंडळ म्हणून आझाद हिंद गणेश मंडळाची ओळख आहे. दरवर्षी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम या गणेश मंडळाच्या वतीने राबवण्यात येतात.

सहा दशकांपासून या मंडळाच्या वतीने गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. यंदाही गणेश स्थापनेनंतर विविध उपक्रम मंडळ राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील बुरुड गल्ली भागातील संकल्प सिध्दी गणेश मंदिरात गुरुवारी सकाळी ७ वाजता हा सामुदायिक गणपती अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. पाचशे महिला या उपक्रमात सहभागी होऊन अनोख्या पध्दतीने गणरायाला वंदन करणार आहेत. घनश्याम महाराज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडणार आहे. यावेळी बीड शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आझाद गणेश हिंद मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अभिजीत कानडे (मो.क्र.९९७५३४३५९४), प्रविण वडतिल्ले (९८६०४९७४३४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आझाद हिंद गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...