आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:विविध क्रीडा प्रकारांत खेळाडूंनी यशासाठी प्रयत्न करावे ; सेपक टकारा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

बीड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्हा हा विविध क्षेत्रांप्रमाणेच आता क्रीडा क्षेत्रातही अव्वल ठरत आहे. सेपक टकारा याप्रमाणेच इतरही विविध क्रीडा प्रकारांत खेळाडूंनी यश मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन अपर पाेलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी केले. बीड जिल्हा सेपक टकारा असोसिएशनच्या वतीने आयोजित ३२ व्या राज्य वरिष्ठ पुरुष व महिला सेपक टकारा अंजिक्यपद क्रीडा स्पर्धेचा समारोप थाटात समारोप झाला. याप्रसंगी विजेत्या संघांना व खेळाडूंना अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, पत्रकार दिनेश लिंबेकर, चंदन पठाण, संजय तिपाले यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्रॉफीचे वितरण करण्यात आले.

या स्पर्धेत पुरुष गटातून प्रथमस्थानी नागपूर संघ राहिला. यासोबतच द्वितीयस्थानी नांदेड जिल्हा संघ, तर तिसऱ्या स्थानी नाशिक व गोंदिया जिल्ह्याचे संघ राहिले. महिला गटातून प्रथमस्थानी सोलापूर, द्वितीयस्थानी सातारा, तर तिसऱ्यास्थानी नाशिक व नांदेडचे संघ राहिले. या सर्वांना अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या हस्ते ट्रॉफीजचे वितरण करण्यात आले. यावेळी चंपावती क्रिडा मंडळाचे सचिव गवते, तिरुमला ग्रुप इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी, सीएनएस ग्रुपचे संचालक इरफान खान, डॉ. ललित जीवानी, आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ.अमृता पांडे, एआयएमआयएम पक्षाचे ज्येष्ठ नेते अब्दुस सलाम, शेख जाहेद, सय्यद सैफ अली यांची प्रमुख उपस्थिती होती.

ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी कुटे यांच्या तिरूमला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, सीएनएस क्लब सह आदींनी सहकार्य केले. सेपक टकारा तथा एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक आणि सचिव परवेज़ खान यांनी समारोप प्रसंगी या स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्यांसह उपस्थित असलेले सर्व मान्यवर स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व महिला पुरुष संघांचे, प्रशिक्षक, अंपायरचे तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार मानले आणि यापुढे ही या स्पर्धा सातत्याने घेतल्या जातील, असे सांगितले. सेपक टॅकराची ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सय्यद सफी, शेख अस्लम, सादेख लोधी, अनिस भाई, अजहर शेख, शेख मुदस्सीर, सय्यद अमन यांनी परिश्रम घेतले.

अविनाश साबळेंप्रमाणे नेत्रदीपक यश प्राप्त करावे
अविनाश साबळे यांनी ऑलिंपिकसह इतरही विविध स्पर्धांमध्ये यश मिळवत देशाचे, जिल्ह्याचे नावलौकिक केले आहे. याचप्रमाणे सेपक टकारा स्पर्धेतही खेळाडूंनी झोकून देऊन सराव करावा. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवत देशाचे व जिल्ह्याचे नाव गाजवावे, असे आवाहन याप्रसंगी सेपक टकारा तथा एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक यांनी केले. सचिव परवेज खान यांनीही याप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...