आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यामध्ये एका सहा वर्षाच्या मुलीवर दोन बायकांच्या दादल्याने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाच्या सदस्या अॅड. संगीता चव्हाण यांनी थेट घटनास्थळी भेट घेऊन दोन दिवसांमध्ये आरोपीला अटक करण्याच्या सूचना गेवराई पोलिसांना तर दिल्याच शिवाय या अनुषंगाने थेट पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले असता पोलिस अधीक्षकांनी दोन दिवसांमध्ये आरोपीला पकडण्याचे आश्वासन अॅड. संगीता चव्हाण यांना दिले.
दरम्यान राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण यांच्या समवेत शेतकरी संघटना युवा पूजा मोरे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख फरजाना ताई शेख यांच्या सहा पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य महिला आयोगाच्या सदस्य एडवोकेट संगीता चव्हाण घटनास्थळी भेट देणार हे समजताच विविध सामाजिक संघटनांनी त्यांना गराडा घालून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे संगीता चव्हाण यांना रितसर निवेदन देऊन आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. दरम्यान आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, घडलेला प्रकार अत्यंत संतापजनक असून मानवतेला काळिमा फासणारा आहे. अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आरोपीला कठोरात कठोर शासन देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या घटनेच्या अनुषंगाने पीडित चिमुरडीच्या पालकांना हवी ती मदत मी करण्यास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी वचन दिले.
लोकप्रतिनिधीने घटनास्थळी भेट न दिल्याने संताप
राज्य महिला आयोगाच्या सदस्या अॅड. संगीता चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. असता संतप्त ग्रामस्थांनी तत्काळ आरोपीस अटक करून कठोर शासन करण्याची मागणी केली. चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट पोलिस अधीक्षकांना मोबाइलद्वारे संपर्क साधून दोन दिवसांमध्ये आरोपीला अटक करण्यात येईल, तेव्हा कोणीही कायदा हातात न घेता सर्वांनी शांत व्हावे, असे आवाहन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.