आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शिवसेना किसान सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते (रा. बाभळवाडी, ता. बीड) यांच्यावर घरात घुसून हल्ला करण्यात आला. खिडक्यांसह वाहनाची तोडफोड केल्याची घटना शहरातील स्वराज्यनगरात गुरुवारी (दि.२८) रात्री दहा वाजता घडली. याप्रकरणी ३३ जणांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
सातपुते हे स्वराज्यनगरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी रात्री ते कुटुंबासमवेत घरी होते. या वेळी दादासाहेब खिंडकर, समाधान खिंडकर, बाबूराव खिंडकर, मच्छिंद्र चव्हाण (सर्व रा.बेलवाडी, ता. बीड), अविनाश पाटोळे (रा. म्हाळस जवळा, ता.बीड), ज्योतिराम भटे, महादेव मातकर, मोतीराम मातकर, शहादेव मातकर, कुंडलिक भटे, बाबा सातपुते, लक्ष्मण सातपुते (सर्व रा.बाभळवाडी, ता.बीड), शंकर कदम रा. गंगनाथवाडी, ता. बीड) व इतर २० ते २५ जणांचा जमाव घरासमोर आला. त्यांनी तलवार, लोखंडी गज, कोयते व लाठ्या-काठ्या व दगडांनी हल्ला केला. भीतीपोटी सातपुते हे कुटुंबासह वरच्या मजल्यावर गेले व दरवाजा आतून बंद केला. यादरम्यान त्याच्या घरात घुसून रोख एक लाख व दोन तोळे सोने लंपास केल्याचे परमेश्वर सातपुते यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. सर्वांवर दरोडा, जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यावरून गुन्हा नोंद झाला. उपनिरीक्षक शैलेश शेजूळ तपास करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.