आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला, चौघांवर गुन्हा

बीड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिसांत दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याची घटना गेवराई तालुक्यातील मारफळा येथे घडली. राहुल रंगनाथ जाधव (२१) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

त्याने गेवराई पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, भैय्या विश्वनाथ जाधव व इतरांविरोधात त्याने गेवराई पोलिसांत केस दाखल केलेली होती. ही केस मागे घेण्यासाठी भैय्या विश्वनाथ जाधव, विश्वनाथ दगडू जाधव, शांताबाई विश्वनाथ जाधव आणि निर्मला रमेश जाधव (सर्व रा. मारफळा) यांनी राहुल याला तू केस का मागे घेत नाही असे म्हणून शिविगाळ करत मारहाण केली. त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला.

बातम्या आणखी आहेत...