आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:दुसरी मुलगी झाल्याने डॉक्टरकडून पत्नी आणि तीन महिन्यांच्या मुलीला पेटवण्याचा प्रयत्न

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काडीपेटी भिजल्याने वाचला जीव, बीडमध्ये उपचार सुरु; कळंबमधील घटना

पेशाने डॉक्टर असलेल्या पतीने दोन मुलीच झाल्याने पत्नीला बेदम मारहाण केली. पत्नीसह तीन महिन्यांच्या मुलीलाही अंगावर रॉकेत ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला मात्र, काडीपेटी भिजल्याने दुसरी काडीपेटी पती शोधताना पत्नीने पळ काढून थेट बसस्थानक गाठले तिथून कुटुंबियांशी संपर्क केला अन् त्यानंतर मध्यरात्री तिला बीडच्या रुग्णालयात दाखल केले गेले मात्र, तीन महिन्यांची चिमुकली सासरीच राहिली आहे. कळंब (जि. उस्मानाबाद) येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली. महिलेचे माहेर बीड जिल्ह्यातील आहे.

केज तालुक्यातील सारोळा माहेर असलेल्या प्रियंका विशाल घुगे यांचा विवाह कळंब (जि.उस्मानाबाद) येथील विशाल घुगे यांच्याशी झाला होता. विशाल हे पेशाने डॉक्टर आहेत. कळंब मध्ये त्यांचे क्लिनीक आहे. दरम्यान, प्रियंका यांना पहिली मुलगी झाल्यापासून सासरच्या मंडळींकडून त्यांचा छळ केला जात होता. त्यांना मारहाण केली जात होती. दुसऱ्यांदा गर्भवती रािहल्याने मुलगा होईल या आशेने त्यांचा त्रास कमी झाला मात्र, तीन, चार महिन्यांपूर्वी त्यांना दुसरीही मुलगीच झाली त्यामुळे ‘तुलाच मुलीच होतात’ म्हणून प्रियंका यांचा अधिक छळ होऊ लागला. बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या प्रियंका काही दिवसांपूर्वीच सासरी गेल्या होत्या. दरम्यान, शुक्रवारी विशाल यांनी कुटुंबियांच्या मदतीने प्रियंकाला बेदम मारहाण केली. त्यांच्या व तीन महिन्यांच्या मुलीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काडीपेटी भिजल्याने त्यांनी प्रसंगावधान राखत घरुन पळ काढला अन् बसस्थानक गाठले तिथून वडिलांशी संपर्क केला मग केजहून वडिल त्यांना घ्यायला गेले बीड जिल्हा रुग्णालयात प्रियंका यांना दाखल केले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.