आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मदहनाचा प्रयत्न:जिल्हाधिकारी कार्यालयात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

बीड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पेट्रोल ओतून घेत मुज्जमील आश्रफ शेख (५०, रा. माळापुरी, ता.बीड) यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

माळापुरी येथे १३ व्या,१४ व्या व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विकासकामे झाली. मात्र, त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला, असा मुज्जमील शेखचा आरोप आहे. तक्रार करूनही चौकशी होत नाही. यामुळे त्यांनी ९ जून रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. आतील प्रवेशद्वारासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेतले. ही बाब निदर्शनास येताच जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगरक्षकाने त्यास रोखले. पेट्रोलची बाटली ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिसांना पाचारण केले. पो.ना. संतोष रणदिवे, अभिजित सानप यांनी धाव घेत त्यास ताब्यात घेतले. सायंकाळी समज देऊन सोडले.

बातम्या आणखी आहेत...