आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:प्रेमविवाह करुन आणलेल्या प्रेयसीला अपशकुनी म्हणून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; बीडमध्ये पतीसह सासू-सासऱ्याविरुद्ध गुन्हा

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या 20 वर्षीय तरुणीला ‘तू पांढऱ्या पायाची आहेस’ म्हणत पतीसह सासू, सासऱ्याने पेट्रोल ओतून पेटवून दिले. परंतु पीडितेने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत कसाबसा जीव वाचविला. गेवराई तालुक्यातील दिमाखवाडी येथे ही घटना घडली. याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यावर गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

प्रतीक्षा अजय राजगुडे (29, रा. दिमाखवाडी) असे त्या नवविवाहितेचे नाव आहे. प्रतीक्षाच्या तक्रारीनुसार, तिचे अजय सुरेश राजगुडे याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याने ते दोघे यावर्षी 12 फेब्रुवारी रोजी पळून गेले होते. परत आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी 23 फेब्रुवारी रोजी त्यांचे लग्न लावून दिले. सुरुवातीचा एक महिना चांगला गेल्यानंतर पती अजय, सासरा सुरेश शहादेव राजगुडे आणि सासू संगीता सुरेश राजगुडे या तिघांनी ‘तू पांढऱ्या पायाची आहेस’ असे म्हणून प्रतीक्षाचा छळ सुरू केला.

तसेच, हुंड्यापोटी पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून तिला मारहाण करून उपाशीपोटी ठेवू लागले. याच मागणीसाठी शनिवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास त्या तिघांनी संगनमताने प्रतीक्षाच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. तेव्हा प्रतीक्षाने कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून घराबाहेर पळ काढला आणि पेटलेली साडी मातीत घुसळून विझविली.

त्यानंतर नैराश्यातून ती जीव देण्यासाठी विहिरीकडे पळू लागली, तेव्हा नातेवाइकांनी तिला अडवले. विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती, सासरा आणि सासूवर गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...