आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेटेंच्या घातपाताचा प्रयत्न; ऑडिओ क्लिप व्हायरल:दोन गाड्या आमच्या वाहनाला दाबत होत्या- 'शिवसंग्राम'चे कार्यकर्ते मायकर यांचा दावा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी मुंबई-पुणे दृतगतीमार्गावर निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर घातपाताचा संशय 'शिवसंग्राम'च्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त झाला. या प्रकरणाची संपूर्ण चौकशीची मागणी मेटे यांच्या पत्नीने केली. याचनंतर एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे.

3 ऑगस्टला विनायक मेटे यांच्या गाडीच्या मागे एक वाहन होते, तर समोर आयशर ट्रक होता. दोन-अडीच किलोमिटर ओव्हरटेकचा खेळ सुरू होता, पण विनायक मेटे यांनी ट्रकला जाऊ द्या, आपली गाडी सुरक्षित चालवा अशा चालकाला सूचना दिल्या होत्या, असा खळबळजनक खुलासा त्यावेळी त्यांच्याच गाडीत बसलेले 'शिवसंग्राम'च्या कार्यकर्ते अण्णासाहेब मायकर यांनी ऑडिओ क्लिपमधून केला. 'दिव्य मराठी' या क्लिपची पुष्टी करीत नाही.

ऑडिओ क्लिपमध्ये काय?

कार्यकर्ता ः यापूर्वी झालं होतं का असं काही?

मायकर : हो..3 ऑगस्टला.

कार्यकर्ता : झालं होतं का?

मायकर : हो 3 तारखेला झालं होतं, शिक्रापूरजवळ.

कार्यकर्ता : कळवायचं ना मग आधी, मोठा इश्श्यू झाला ना..

मायकर : साहेबांना माहित होतं हे, साहेबांना मी थांबायला सांगितलं होतं. मी सुद्धा त्यादिवशी साहेबांसोबत गाडीत होतो. आयशर ट्रक पुढे होता आणि गाडी आम्हाला मागून दाबत होती.

कार्यकर्ता : आता अपघात झालेला आयशर तोच आहे का?

मायकर : मी त्या वाहनाचा नंबर घेतला नव्हता. त्या दिवशी मी जर गाडीतून फोटो काढला असता तर आयशर आणि चारचाकी गाडीचाही नंबरही मिळाला असता. चारचाकी वाहनात तीन ते चार जण होते. ते आम्हाला जाऊच देत नव्हते. तर आयशरही आम्हाला पुढे जाऊ देत नव्हता. ते पुढे जायचे, मागे यायचे, पुन्हा लेफ्ट साईटने कट मारुन गल्लीत घुसले.

कार्यकर्ता : खूपच धक्कादायक आहे हे..!

मायकर : त्या दिवशी साहेबांना मिटींगला जायचे असल्यामुळे ते म्हणाले की, जाऊ द्या मद्यपी असतील.

कार्यकर्ता : साहेब जागे होते का तेव्हा?

मायकर : हो, होते ना साहेब जागे, चालकाला सांगत होते की, गाडी हळू चालव. त्याच्या मागे जाऊ नकोस, जाऊ दे त्यांना पुढे. किमान दोन ते अडीच किलोमीटर असेच सुरु होते.

कार्यकर्ता : दोन अडीच किलोमीटर, आणि रात्री किती वाजता हे झालं सगळं?

मायकर : रात्री साडे अकरा वाजता.

ती गाडी कुणाची?

अण्णासाहेब मायकर हे विनायक मेटेंचे सहकारी आहेत. तीन ऑगस्टला ते मेटे यांच्यासोबत गाडीत होते. त्यांचा आणि अन्य एका कार्यकर्त्यांच्या संवादाची ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. यात कार्यकर्त्याने माग काढणाऱ्या गाडीचा फोटो ओळखला आहे. ही गाडी पुण्याची असून तीन ऑगस्टला गाडीचे लोकेशन काय होते हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. या गाडीची सखोल चौकशी होणार असून मुख्यमंत्र्यांनीही अपघात प्रकरणाच्या मुळाची जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.

बातम्या आणखी आहेत...