आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाडेवडगाव खून प्रकरण:तीन ठिकाणी पोलिसांना गुंगारा देत एएसपीकार्यालयात मुलांसह आत्मदहनाचा प्रयत्न, पतीच्या खुनाचा तपास सीआयडीकडे देण्याची विधवेची मागणी

अंबाजोगाई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंगावर डिझेल ओतून घेताच पोलिसांनी मोहरबाई यांना रोखले - Divya Marathi
अंगावर डिझेल ओतून घेताच पोलिसांनी मोहरबाई यांना रोखले
  • लाडेवडगाव खून प्रकरणाचा तपास योग्य रीतीने केला असून आरोपी अटकेत आहेत -स्वाती भोर, अपर पोलिस अधीक्षक अंबाजोगाई

पतीच्या खून प्रकरणाचा तपास पोलिसांकडून योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे हा तपास सीआयडीकडे द्यावा, अशी मागणी करत खून झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने गुरुवारी गांधी जयंतीदिनी दोन मुलांसह अंबाजोगाईच्या अपर पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. आठवडाभरापूर्वीच त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिस बंदोबस्त तैनात होता. मात्र तिघांनी तीन ठिकाणी पोलिसांना गुंगारा देत अपर पाेलिस अधीक्षक कार्यालय परिसरात प्रवेश केला. वेळीच महिला पाेलिसांनी तिघांनाही राेखल्याने पुढील अनर्थ टळला.

लाडेवडगाव (ता. केज) येथील बाबासाहेब चंद्रभान लाड (वय ३८) यांचा १७ जुलै २०२० रोजी खून झाला होता. या प्रकरणी सहा जणांविरोधात युसूफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला गेलेला आहे. काही आरोपींना अटकही केलेली आहे. दरम्यान, मृत बाबासाहेब यांच्या पत्नी मोहर लाड यांनी पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत त्यांनी गृहमंत्र्यांना आठवडाभरापूर्वी निवेदनही दिले होते. मृत बाबासाहेब यांचा मोबाइल, रक्ताने माखलेले कपडे, जागेचा पंचनामा, पंचनाम्याची प्रत, खुनासाठी वापरलेले हत्यार, लोखंडी सळ्या, गज, पोलिसांनी जप्त केल्या नाहीत. मृत बाबासाहेब यांच्या फोनचे काॅल डिटेल्स व मोबाइल नंबरची पडताळणी झाली नाही. या प्रकरणातील एक आरोपी पोलिसांसमोर विष प्राशन करून रुग्णालयात दाखल झाला, हे सर्व संशयास्पद आहे. त्यामुळे खुनाचा तपास युसूफवडगाव पोलिसांकडून काढून तो सीआयडी अथवा अन्य यंत्रणेकडून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. यासाठी गांधी जयंतीदिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.

एसपींकडून चौकशीचे आदेश

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक आर. राजा यांनी अंबाजोगाईच्या अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर व इतर अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीचे आदेश देत त्यांनी आक्षेप असलेल्या प्रत्येक मुद्द्याची पडताळणी करण्याचे आदेश दिले.

तपास योग्य रीतीने केला

लाडेवडगाव खून प्रकरणाचा तपास योग्य रीतीने केला असून आरोपी अटकेत आहेत. दोषारोपपत्र तयार आहे. त्याची पडताळणी सुरू आहे. युसूफवडगाव पोलिसांनी तपासातील भेदभाव केला नाही. -स्वाती भोर, अपर पोलिस अधीक्षक अंबाजोगाई.

मला वाचवू नका...

माझे पती कपडे शिवण्याचा धंदा करत होते. त्यांच्यावर आमच्या घराची उपजीविका होत होती. परंतु त्यांचाच खून झाल्यामुळे मी जिवंत राहण्यात तरी काय अर्थ आहे, असे म्हणत मोहरबाई व मुलांनी अपर अधीक्षक कार्यालयासमोर आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांची मने हेलावून गेली.

गुरुवारी काय घडले‌?

गुरुवारी मोहरबाई लाड यांना राेखण्यासाठी यशवंतराव चव्हाण चौक ते अपर पोलिस अधीक्षक कार्यालयादरम्यान साध्या वेशातील पोलिस तैनात होते. मात्र, मोहरबाई व त्यांची दोन मुले ऋषिकेश (१४) आणि शुभम (१२) हे पोलिसांना गुंगारा देऊन मोरेवाडी परिसरातील गल्लीतून अपर अधीक्षक कार्यालयात आले. तिघांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न करताच उपस्थित पोलिसांनी त्यांना रोखले.

बातम्या आणखी आहेत...