आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:आम आदमी पार्टीच्या कडा येथील मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा : येडे

बीड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यामध्ये प्रथमच आम आदमी पार्टीचा मेळावा हा ग्रामीण भागामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. कडा येथे बुधवारी (ता.७ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता महेश मंगल कार्यालयात हा मेळावा होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी दिली.

याबाबत दिलेल्या पत्रकात येडे यांनी म्हटले आहे, बीड जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, विद्युत, शेतकऱ्यांचे प्रश्न, मजुरांचे प्रश्न या विषयांवर काम करण्यासाठी आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापकपणे कार्य केले जात आहे. आम आदमी पार्टी बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा ग्रामीण भागामध्ये मेळावा आयोजित करत आहे. या मेळाव्यासाठी आपचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरेजी, ओबीसी चळवळीचे लोकनेते हरिभाऊ राठोड, अजिंक्य शिंदे, धनंजय शिंदे, अजित खोत, सुग्रीव मुंडे, अनिल ढवळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व सर्व सामान्य नागरिक यांनी जास्तीत जास्त संख्येने या ग्रामीण मेळाव्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष, माजी सैनिक अशोक येडे व पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

बातम्या आणखी आहेत...