आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रभू रामचंद्र हे आदर्श राजा, आदर्श पती व आदर्श पुत्र आहेत, अशा मर्यादा पुरुषोत्तम रामाशिवाय रामराज्य येणे शक्य नाही, असे मत परमपूज्य सुंदर चैतन्य स्वामी महाराजांनी केले. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ बीडतर्फे श्री श्री राधा गोविंद मंदिरात रामजन्मोत्सव रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ‘राम कथेचे महत्त्व व रामाची सेवा करण्याचे फळ’याबाबत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. रामनवमीनिमित्त श्री श्री राधा गोविंद यांना सीता-राम यांच्या रूपामध्ये आकर्षक साज श्रृंगार करण्यात आला होता.
८ एप्रिल ते १० एप्रिलपर्यंत मॉरिशस येथील सुंदर चैतन्य गोस्वामी महाराजांच्या वाणीतून श्रीराम कथेचे आयोजन इस्कॉन बीड मंदिरातर्फे केले होते. सायंकाळच्या सत्रात श्रीरामाचे भक्त हनुमान व शबरी यांनी कशा प्रकारे प्रभू रामचंद्रांची अनन्य व शुद्ध भावनेने सेवा केली, याचे वर्णन तसेच प्रभू रामचंद्रांच्या जन्माविषयीचे वर्णन यावर राम कथा झाली. बीडच्या इस्काॅनचे अध्यक्ष विठ्ठलानंद दास यांनी भगवतांच्या मूर्तीला श्रृंगार चढवला. यादवेंद्र दास,महामंत्र दास, राधिका जीवन दास, देवकीपुत्र दास, मथुरा मंडळ दास आदींचे सहकार्य लाभल्याचे श्रीमान कृष्णनाम दास यांनी सांगितले.
भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
पहाटे साडेचार वाजेपासून भगवंतांची मंगल आरती, शृंगार दर्शन, दहा वाजता सीता-राम-लक्ष्मण यांचा अभिषेक, श्री राम कथा व सर्व भाविक भक्तांसाठी छप्पन भोग दर्शन महाआरती व हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.