आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:औरंगाबादच्या महिला क्रिकेट संघ; स्वाती पाटीलची महिला क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

अंबाजोगाई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रहिवासी स्वाती पाटील हिची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या महिला क्रिकेट संघात निवड झाली असून ही वेस्टझोन स्पर्धा जयपुर या ठिकाणी २० जूनपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी विद्यापीठात १५ ते १९ जून या काळात शिबीर होणार आहे. स्वाती पाटील ही यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये बी.कॉम द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेते. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.

मोहित परमार, माही परमार, स्वप्नील कोकाटे हे अबांजोगाई क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रशिक्षण देत आहेत. तसेच स्वाती ही या स्पर्धेसाठी अबांजोगाई मधून या वर्षी एकमेव खेळाडू आहे. स्पर्धेसाठी दत्तात्रय पाटील, प्राचार्य डॉ.शिवदास शिरसाठ, डॉ.नरेंद्र काळे, प्रा.भारत पल्लेवाड, अनंत कर्णावट, संतोष कदम, नागेश औताडे, हरिश रुपडा, शुभम लखेरा, राजेंद्र देशपांडे, विनोद गगणे, भालचंद्र डोके, डॉ.असद जानुल्ला, आदेश कर्णावट यांच्यासह अंबाजोगाई तालुका व जिल्ह्यातील नागरिकांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...